नविदिल्ली
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक यांची दिल्ली विधानसभा निवडणूकी करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारक पदी नियुक्ति करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी व प्रशासन प्रभारी एस.आर.कोहली यांनी
भारतीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून दिल्ली विधानसभा निवडणुकी करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २० स्टार प्रचारकांची नियुक्ति केल्याचे कळविले आहे.
त्यात अजीत पवार (राष्ट्रीय अध्यक्ष), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रीय कार्याध्यक्ष),सुनील तटकारे (राष्ट्रीय महासचिव), बृज मोहन श्रीवास्तव (राष्ट्रीय महासचिव), सुबोध मोहिते (राष्ट्रीय महासचिव), पार्थ पवार, अविनाश आदिक (राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ता),संजय प्रजापति (एनसीपी पर्यवेक्षक), उमा शंकर यादव,धीरज शर्मा, चैतन्य सनी मनकर,श्रीमती एस. देवयानी आश्रा, फैज अहमद फैज, एस के जेठवा, चैतन्य सिंह, वीरेन्द्र सिंह, तेज सिंह वरुण, दीपाली अरोड़ा, इंदरजीत सचदेव, रोशनी रावत यांचा समावेश आहे.