नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे 26 जानेवारीचे मुहूर्तावर राहुल वाडकर यांच्या आरएसएस जिमचा शुभारंभ झाला.
महाराष्ट्राचा कबड्डी संघाचा कॅप्टन प्रो कबड्डी खेळाडू शंकर गदाई व जयपूर कबड्डी खेळाडू राहुल धनवडे यांच्या हस्ते रिबन कापून या जिमचे उद्घाटन झाले. नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, ह.भ.प.साहेबराव महाराज गव्हाणे, सिद्धांत सीडचे संचालक सिद्धांत नवले,पसायदान उद्योग समूहाचे संचालक किशोर भणगे,डॉ. शिवाजीराव शिंदे, नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव तागड, नामदेवराव पाटील निकम, देवेंद्र काळे,फिटनेस कोच अवि शेळके, अवी वाईकर, सर्जेराव खरात आणि सर्व नागेबाबा ग्रुप व मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित होते.
प्रसिद्ध गायक अविनाश वाडकर व आरएसएफ फिटनेस क्लबचे संचालक राहुल वाडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.