नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखेतील खातेदार सौ.अर्चना देवेंद्र वाघुले यांना नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत हॉस्पिटल खर्च देण्यात आला.
नागेबाबा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून चालू केलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेमध्ये सौ.अर्चना देवेंद्र वाघुले यांनी
१५०० रुपये भरून नाव नोंदणी केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा रस्ता अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना
६९ हजार ५७ रुपये खर्च आला होता.
नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या विमा पॉलिसी मधून त्यांना हॉस्पिटल खर्चाची ६९ हजार ५७ रुपयांची मदत मिळाली आहे.
सदर मदतीचा धनादेश रामेश्वर महाराज कंठाळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. गोंडेगावचे माजी सरपंच आसाराम वाघुले ,नागेबाबा मल्टीस्टेटचे सीईओ अनिल कदम, जनरल मॅनेजर भरत दारुंटे, राजेंद्र चिंधे ,मुख्यध्यापक संदीप फुलारी , भेंडा शाखा व्यवस्थापक संतोष सापते, लक्ष्मण थोरात आदी उपस्थित होते.