अहिल्यानागर दि.२७
अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२४ ची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची चौथे शिवाजी महाराज स्मारक (हुतात्मा स्मारक) लाल टाकी रोड येथे सुरुवात करण्यात आली.
यावेळी दैनिक प्रभातचे संपादक जयंत कुलकर्णी, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उद्योजक, वक्ता, लेखक एन. बी. धुमाळ, प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, छत्रपती संभाजीनगरचे सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, नाशिक विभागाचे सचिन जोपुळे, अनिल बाविस्कर, संजय डाडर, रामदास शिंदे,सुखदेव फुलारी, बाळासाहेब डोहाळे, पोपट उगले आदींची उपस्थिती होती.
चौथे शिवाजी महाराज स्मारक (हुतात्मा स्मारक) लाल टाकी रोड येथून सुरुवात करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीचा समारोप राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे करण्यात आला. ग्रंथदिंडीमध्ये रेसीडेन्सियल हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.