नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील व्यावसायिकांनी शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सर्व दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवली, सकाळी बाजारपेठेतून फेरी काढली नंतर भेंडा बसस्थानक चौकात सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानक चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे तर त्यांच्या समवेत इतर दुकानदार साखळी उपोषण करणार आहेत.
भेंडा येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्याच्या नोटीसा दिल्यानंतर सर्व दुकानदारांनी नालीवर असलेली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली हे अंतर ११ मीटर आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग १५ मीटर जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यावर ठाम आहेत अतिक्रमणे हटवल्यावर रस्ता डांबरीकरण करण्याचे कोणतेही नियोजन नाही यामुळे १५ मीटर जागेवरील अतिक्रमणे काढू नयेत अशी व्यावसायिकांची मागणी आहे.
उपोषणस्थळी झालेल्या सभेत नामदेव निकम, अशोकराव मिसाळ,काशिनाथ नवले, वैभव नवले,सोपान महापूर,गणेश गव्हाणे, किशोर मिसाळ,बापूसाहेब नजन,दत्तात्रय काळे, सुनील गव्हाणे, वाल्मिक लिंगायत, गणेश चौधरी, सरपंच शरद आरगडे,बाळासाहेब आरगडे,
आप्पासाहेब वाबळे , भारत आरगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी व्यापा-यांची दुकाने वाचली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी देवेंद्र काळे, किशोर मिसाळ, शिवाजी फुलारी, सतीश शिंदे, योगेश लोळगे, गणेश चौधरी, गणेश शिंदे, विनायक मिसाळ,पंढरीनाथ फुलारी,अशोक काळे, यडूभाऊ सोनवणे, हेमंत बारगुजे, आसाराम कदम, डॉ. लहानू मिसाळ, रावसाहेब पाटेकर, लखन गरड यांचे सह सर्व व्यावसायिक उपस्थित होते.माजी आमदार पांडुरंग अभंग व राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैया शेख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
*मा.आ.पांडुरंग अभंग…
शेवगाव नेवासा रस्ता १९२२ साली झालेला आहे हा रस्ता ६६ फुटाचा आहे. सध्या भेंडा येथील रस्ता ७० फुटाचा आहे.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर व्यावसायिकांची अतिक्रमणे नाहीत. यामुळे अतिक्रमणे हटविण्याचा प्रश्नच येत नाही.