नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील फुलारी वस्तीवर बांधण्यात येत असलेल्या श्रीसंत शिरोमणि सावता महाराज मंदिराचे चौथ-याचे वरील बांधकामास दि. १३ रोजी राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री.शेख यांनी म्हंटले आहे की, मी सर्व समाजातील जनतेसाठी सामाजिक जाणिवेतुन काम करणार असुन सर्व सामान्य जनते विषयी आपुलकीने कार्यरत राहणार आहे. मला कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी संपर्क करा मी मदत व सहकार्य करण्याचा प्रयत्न करील.
सुदाम खाटिक ,मुकुंद अभंग , संत सावता महाराज मंदिर सेवेकरी संदीप फुलारी , बाळासाहेब फुलारी , संदिप जावळे ,शिवाजी फुलारी,राजेंद्र फुलारी, विष्णू गरड , ज्ञानदेव पुंड , कारभारी गरड , सचिन फुलारी , गणेश जावळे , सुरेश जावळे , राजेंद्र जावळे सह परिसरातील भाविक उपस्थित होते.