कोपरगाव
भुतलावावरील संपूर्ण सजीव सृष्टी निरोगी राहण्यासाठी सर्व नद्या निरोगी, अतिक्रमण विरहित व प्रदूषण मुक्त ठेवण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मॅगसेस पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंग यांनी
केले.कोपरगाव येथील नदी स्वच्छता सवांद कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या ३०० आठवड्यापासून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरी नदीची गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे व त्यांची संपूर्ण टीम स्वच्छता करत असलेल्या अभियानाचा ३०१ वा आठवडा तसेच गोदावरी नदीचा जन्मोत्सव व स्वच्छता संवाद अभियान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक चंद्रकांत दळवी, गृह विभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरी नदीची महाआरती पूजन करत साजरा करण्यात आला.
कोपरगाव शहरातील गोदावरी नदीपात्रात शुक्रवार दि १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अमृत संजीवनी चेअरमन पराग संधान, क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संदीप रोहमारे,नमामी गोदाचे राजेश पंडित, शुक्राचार्य मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद प-हे, सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे, एसएसजीएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे, तालुका विद्यार्थी सहायक समितीचे डॉ. निखिल महानुभव, सिध्दार्थ शेळके,विजय सांगळे, नारायण अग्रवाल,वन प्रस्थाचे सर सदस्य आणि दिप गुरली ज्येष्ठ नागरिक युवा मंच व धन निरंकारी मिशनचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आदीसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी गेल्या ३०० आठवड्यापासून अविरतपणे गोदावरी नदीची स्वच्छता करत असलेले गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे,प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे, संतोष होणे, आप्पा नवले, सोमनाथ पाटील, निखिल दिवटे, शिला गाडे, शुभम वाघ, विनायक सोनवणे, आकाश पंडोरे आदी गोदामाई सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर ३०० आठवड्याच्या स्वच्छता सेवेच्या माहिती पुस्तकाचे तर इंदिरा खुराणा लिखित Climate resilient socioeconomic growth through water conservation या पुस्तकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
डॉ.अविनाश ढाकणे व चंद्रकांत गवळी यांनी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत सुखी समाधानी निरोगी भविष्यासाठी सर्वांनी आपला परिसर नदी नाले स्वच्छ ठेवत निसर्गाचे संवर्धन करणे काळाची नितांत गरज असल्याचे सांगितले.
आदिनाथ ढाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुरेश गोरे यांनी
सूत्रसंचालन केले. महारुद्र गालट यांनी आभार मानले.