भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील व्यावसायिकांनी शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सर्व दुकाने भेंडा बसस्थानक चौकात सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे व बाबासाहेब पटारे यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आमरण उपोषण आ.विठ्ठलराव लंघे यांच्या मध्यस्तीने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
भेंडा येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्याच्या नोटीसा दिल्यानंतर सर्व दुकानदारांनी नालीवर असलेली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली हे अंतर ११ मीटर आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग १५ मीटर जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यावर ठाम आहेत. अतिक्रमणे हटवल्यावर रस्ता डांबरीकरण करण्याचे कोणतेही नियोजन नाही यामुळे १५ मीटर जागेवरील अतिक्रमणे काढू नयेत.भेंड्यात वाहतूक कोंडी होत नाही यामुळे आता अतिक्रमणे हटवू नये अशी दुकानदारांची मागणी आहे.भेंड्यानंतर नेवासा फाटा, कुकाणा येथील व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. कालपासून भेंड्यात सुरू असलेल्या उपोषणाला कुकाणा, सोनई व परिसरातील व्यावसायिकांनी भेट देऊन त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते.
नेवाशाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण शांततेत करण्याचे आवाहन केले होते.
मात्र आमदार विठ्ठलराव लंघे यांनी
भेंडा येथे सूरु असलेल्या आमरण
उपोषणस्थळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि.१५ रोजी दुपारी भेट देऊन व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेतले. मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून मार्ग काढतो यासाठी तीन दिवसांचा अवधी द्यावा व तोपर्यंत उपोषण तात्पुरते स्थगित करावे अशी विनंती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केली ,त्यास मान देऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
यावेळी बोलताना शरद आरगडे म्हणाले की, वाढीव रस्ता मंजूर नाही,रस्त्याचे कामासाठी निधी उपलब्ध नाही तरी ही संपूर्ण दुकाने काढण्याचे आडमूठे धोरण सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेले आहे. ज्यावेळेस वाढीव रस्त्याचे कामाला मंजूरी मिळेल आणि प्रत्यक्ष काम सूरु होईल त्यावेळी सर्व दुकाने आम्ही स्वखर्चाने काढून घेऊ, तो पर्यंत दुकानांना हात लावू नका.
यावेळी नामदेव निकम, बापूसाहेब नजन,
बाळकृष्ण पुरोहीत, देवेंद्र काळे, किशोर मिसाळ, शिवाजी फुलारी, सतीश शिंदे, योगेश लोळगे,गणेश चौधरी, गणेश शिंदे, विनायक मिसाळ,पंढरीनाथ फुलारी,राजेंद्र चिंधे, अशोक काळे, हेमंत बारगुजे, आसाराम कदम, रावसाहेब पाटेकर, लखन गरड, कॉ.भारत आरगडे, अकबर सय्यद, सुनिल गव्हाणे, राम गरड, सतिष शिंदे, किशोर पाटील, भारत कुंभकरण, योगेश कटरीया, सुरेश कटरिया, सुरेश धनवडे, बाबासाहेब पटारे, शशिकांत मोरे, महेश बनसोडे, चेतन बोरा, मोसिम पठाण, अशोक राजमाने, संजय शहाणे,अशोक शिनगारे दाजी,वाल्मीक लिंगायत, योगेश फुलारी, राजू पवार आदि उपस्थित होते.
*मंगळवारी विशेष ग्रामसभा…
भेंड्यातील अतिक्रमणे काढून टाकू नयेत यासाठी मंगळवारी सकाळी विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे
*तीन दिवसांचा अवधी द्या…
नेवासा तालुक्यातील नेवासा, नेवासा फाटा, भेंडा, कुकाणा व तालुक्यातील सर्व दुकानदारांच्या समवेत मी आहे. प्रशासन व व्यावसायिक यांच्या समन्वयातून आपण योग्य तो मार्ग काढू. आपली बाजारपेठ वाचवण्यासाठी मी प्रयत्न करतो आपल्या वतीने मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून मार्ग काढतो यासाठी तीन दिवसांचा अवधी द्यावा व तोपर्यंत उपोषण तात्पुरते स्थगित करावे.
–आ.विठ्ठलराव लंघे,नेवासा विधानसभा