गुहा प्रतिनिधी राहुल कोळसे:राहुरी तालुक्यातील गुहा येथे कृषी विभागाच्या अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य, 2024-25 बाजरीनंतर हरभरा या प्रकल्पांअंतर्गत शेतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी कामगंध सापळे, सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड 2 यांच्या वापरासंबंधी माहिती देऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या कृषी दर्शनी चे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना गुहा येथील कृषी सहाय्यक प्रतीक ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक भारत कातोरे उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे व मंडळ कृषी अधिकारी देवळालीप्रवरा प्रमोद गावडे यांचे सहकार्य यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी गुहा येथील शेतकरी दत्तात्रय कोळसे, दिलीप बोरुडे, भास्कर इरुळे, ज्ञानदेव कोळसे, भागवत कोळसे, सुखदेव कोळसे,पोपट डौले, जगन्नाथ कोळसे, रवींद्र ताकटे, विशाल कोळसे, विजय शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.