नेवासा
नेवासा तालुक्यातील सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे चौदा विद्यार्थी .हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादी चमकले आहेत.
दि.19 जानेवारी 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्र महाविद्यालय अहिल्यानगर आयोजित अहिल्यानगर टॅलेण्ट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. या डॉ. हेडगेवार प्रज्ञाशोध (एटीएस)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. ही परीक्षा दरवर्षी फक्त इयत्ता चौथी व इयत्ता पाचवी तसेच इयत्ता सातवी व आठवी या वर्गासाठीच घेतली जाते.
या परीक्षेत सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे एकूण १८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते,ते सर्व उत्तीर्ण झाल्याने १०० टक्के निकाल लागला असून चौदा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत .
परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्याना ३०० पैकी २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत .
*जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
असे…
समर्थ ढेरे (282 गुण जिल्ह्यात पाचवा),
*आयुष नवाळे – (282 गुण जिल्ह्यात पाचवा), शुभ्रा कवडे (278 गुण जिल्ह्यात सातवी),शौर्य काळे (276 गुण जिल्ह्यात आठवा),श्रृती दाभाडे ( 276 गुण जिल्ह्यात आठवी), स्वरांजली गिलबिले (268 गुण जिल्ह्यात बारावी),
आर्य निंबाळकर.( 266 गुण जिल्ह्यात तेरावा), संस्कृती साळुंके ( 264 गुण जिल्ह्यात चौदावी),आरुषी गायकवाड ( 262 गुण जिल्ह्यात पंधरावी),गार्गी लांडे ( 258 गुण जिल्ह्यात सतरावी),
ओम गवळी (254 गुण जिल्ह्यात एकोणीसावा),शिवम कंठाळी ( 252 गुण जिल्ह्यात विसावा),आराध्या आरगडे (250 गुण जिल्ह्यात एकविसावी), गौरव बर्वे (250 गुण जिल्ह्यात एकविसावा).
*इतर गुणवंत विद्यार्थी असे…
स्वरूप काळे (248 गुण), प्रांजल दसपुते (246 गुण) दिया आरगडे (240 गुण) , परिणिती मुरकुटे(214 गुण). सर्व यशस्वी विद्यार्थ्याना वर्गशिक्षक कल्याण नेहूल यांचे मार्गदर्शन लाभले . मुख्याध्यापक पोपट घुले व सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य मिळाले.
गटशिणाधिकारी शिवाजी कराड, केंद्रप्रमुख सुखदेव सोनवणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य सौंदाळा गावाचे लोकसेवक सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व सदस्य सौंदाळा ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे .