अहिल्यानगर
उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा सहिंतेनूसार प्राप्त अधिकाराचा वापर करत उपविभागाच्या महसुल स्थळसिमेच्या हद्दीतील मुळा उजवा कालवा आवर्तन कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कालव्याच्या ठिकाणी प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर, फिरण्यावर या कालावधीत निर्बंध असतील. कालव्याच्या आजुबाजूस ५०० मीटर परिासरात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. हा आदेश कार्यकारी अभियंता, पाटबंधारेविभागांतर्गत नियुक्त अधिकारी, कर्मचारी व वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.