भेंडा प्रतिनिधी:– नेवासा तालुक्यातील सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे चौदा विद्यार्थी हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. सौंदाळा जिल्हा परिषद शाळेतील शौर्य संदेश काळे (276 गुण जिल्ह्यात आठवा) आला आहे.
दि.18 जानेवारी 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्र महाविद्यालय अहिल्यानगर आयोजित अहिल्यानगर टॅलेण्ट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. या डॉ. हेडगेवार प्रज्ञाशोध (एटीएस)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. ही परीक्षा दरवर्षी फक्त इयत्ता चौथी व इयत्ता पाचवी तसेच इयत्ता सातवी व आठवी या वर्गासाठीच घेतली जाते.
या परीक्षेत सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे एकूण 18 विद्यार्थी परीक्षेला बसले होते,ते सर्व उत्तीर्ण झाल्याने 100 टक्के निकाल लागला असून चौदा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत . परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्याना 300 पैकी 200 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत .
सर्व यशस्वी विद्यार्थ्याना वर्गशिक्षक कल्याण नेहूल यांचे मार्गदर्शन लाभले . मुख्याध्यापक पोपट घुले व सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य मिळाले. गटशिणाधिकारी शिवाजी कराड, केंद्रप्रमुख सुखदेव सोनवणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य सौंदाळा गावाचे लोकसेवक सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य , सौंदाळा ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे .