अहिल्यानगर
जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या साखर आयुक्तीपदी झालेल्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांची नगरचे नवे जिल्हाधिकारी नियुक्ति झाली आहे.
डॉ. आसिया हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी असून ते जोधपूर (राजस्थान) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे वडील डॉक्टर तर आई गृहिणी आहे. वडिलांची इच्छा डॉक्टर होती. त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले. त्यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्वयंम अभ्यास करून हे यश संपादन केले. 2016 मध्ये त्यांना देशात 56 रँकवर आयएएस मानाकंन मिळविले. त्यानंतर मालेगाव (नाशिक) (Malegaon, Nashik) येथे प्रांताधिकारी म्हणून काम करताना शहर करोना मुक्त करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन भिवंडी महानगरपालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली. सालीमठ यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारीपदा पदभार होता. जिल्हाधिकारीपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत अनेक नावे चर्चेत होते. अखेर राज्य शासनाने डॉ. आशिया यांची नियुक्ती केली आहे.