Friday, March 28, 2025

डॉ.प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा मार्फत देण्यात येणारे सन २०२२-२३ वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाले असून अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांची नाशिक विभागातून या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

उच्च शिक्षण पुणे यांनी सन २०२२-२३ या वर्षासाठीचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कारार्थांची निवड छाननी समितीची अहवाल शासनस्तरावरील निवड समितीसमोर सादर केला होता. त्यानुसार सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता राज्य शासनाने दिली आहे.
सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे खालील विवरणपत्रात दर्शविल्यानुसार राज्यातील ६ महिलांना प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात आली.

*निवड झालेले पुरस्कारार्थी असे…

१) नाशिक विभाग:–डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी सावेडी, अहिल्यानगर.
२) पुणे विभाग:- श्रीमती जनाबाई सिताराम उगले रा. उगलेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे
३)कोकण विभाग:– श्रीमती फुलन जोतीराव शिंदे सीवूड्स, नेरुळ, नवी मुंबई.
४)छ.संभाजीनगर विभाग:– श्रीमती मिनाक्षी दयानंद बिराजदार शिवाजीनगर आमखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
५) अमरावती विभाग:- श्रीमती वनिता रामचंद्र अंभोरे बालाजीनगर, मेहकर, ता. मेहकर जि. बुलढाणा
६) नागपूर विभाग:–श्रीमती शालिनी आनंद सक्सेना गुरुदेवनगर, नंदनवन लेआऊट, नागपूर

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!