नेवासा
महिलांना-मुलींना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केलं .मुलीं विषयी समानतेची भावना निर्माण व्हायला हवी. कुटुंब व्यवस्थापनेची जबाबदारी पार पाडायची सूक्ष्म जाणीव मुलींमध्ये असते. मुलींनी शिक्षणाबरोबर सामाजिक मूल्ये जपावे, संस्कार आणि सुरक्षिततेवर भर द्यावा असे प्रतिपादन जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री सरवदे-पवार यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलीत जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.डॉ.प्रा.राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दीपक राऊत, राणी स्वामी,शिला गिरीकुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
डॉ.प्रा.राजेंद्र गवळी,उपप्राचार्य दीपक राऊत,शिक्षक योगिता शेजुळ, सुदीप खरात ,प्रवीण कोकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
सायन्स ओलंपियाड, विज्ञान प्रदर्शन व मराठी निबंध या स्पर्धेच्या माध्यमातून क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथीच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयश्री उंडे यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी श्रेया आगळे व अक्षरा कावरे यांनी सूत्रसंचालन केले.शिक्षिका राणी स्वामी यांनी आभार मानले.