राहता
आहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनचा संपूर्ण कारभार महीला पोलीसांना सोपवुन ८ मार्च जागतिक महीला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी दिली.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबमें यांचे निर्देशानुसार व उपविभागिय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस स्टेशन येथे ८ मार्च रोजीचा जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आलेला आहे.
जागतिक महीला दिनानिमित्त पोनि नितीन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन सकाळी १० ते १२ वाजे पावेतो राहाता पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले महीला पोलीस अधिकारी पोलिस उपनिरीक्षक कोमल कुमावत यांना पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. तसेच महीला पोलीस अंमलदार पोहेकाँ आर.एस. वरघुडे यांना पोलीस ठाणे अंमलदार, मपोना आर.ए. राजगिरे यांना सी.सी.टी.एन.एस, मपोकाँ. के. एस. बिरुटे यांना वायरलेस, तसेच मपोकाँ एस. एन. चौधरी यांना सी.सी.टी.एन.एस. फिंडिंग, मपोकों व्ही एच हासे यांना स्वागत कक्षास नेमण्यात आले. त्याप्रमाणे महीला पोलीस अधिकारी व महीला पोलीस अंमलदार यांनी ते योग्यरित्या कामकाज पार पाडले. व पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळाला.
त्यानंतर १२ ते १ वाजेपावेतो राहाता शहरातील डॉ. कानडे हॉस्पीटल, राहाता येथे जागतिक महीला दिना निमित्त श्री. व सौ. डॉ. कानडे यांचे सहयोगाने राहाता पोलीस स्टेशनचे महीला पोलीस अधिकारी व महीला पोलीस अंमलदार यांची वैद्यकिय तपासणी करण्यात येवुन दैनदिन ड्यूटी करतांना येणाऱ्या तणावातून स्वताचे स्वास्थ हे रोजचे व्यायामाने कसे व्यवस्थित राहील याबाबत श्री. व सौ डॉ. कानडे यांनी मार्गदर्शन केले.
त्या प्रमाणे १ ते २ वाजे दरम्यान जागतिक महीला दिनानिमीत्त राहाता पोलीस स्टेशन येथील महीला पोलीस अधिकारी कोमल कुमावत, महीला पोलीस अंमलदार मपोहेकाँ आर.एस. वरघुडे, मपोना आर ए राजगिरे, मपोकाँ के एस बिरुटे, मपोकाँ एस एन चौधरी, मपोकॉ व्ही एच हासे, महोम/उषा तारगे, संगिता गमे, माधुरी सोमवंशी, कुसुम शिंदे, गाडेकर या रणरागिणींचा जिल्हा परीषद अहिल्यानगरच्या माजी अध्यक्षा, सो. शालिनी ताई विखे यांचे हस्ते दैनदिन डायरी व पुष्पगुच्छ देवून सत्कार करुन त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने पोनि नितीन चव्हाण यांनी सर्व महीला स्टाफचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार केला.