भेंडा/नेवासा
जागतिक महिला दिनानिमित्त भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहात झालेल्या महिला ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या माजी महिला पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला . तसेच सामुहिक संविधान वाचन करण्यात आले.
शनिवार दि.८ मार्च रोजी उपसरपंच संगीता शिंदे यांच्या अध्यक्षतेख़ाली झालेल्या महिला ग्रामसभेस एकात्मिक बाल विकास प्रकल्पचे सचिन ठाकरे , ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे , माजी उपसरपंच सीमा फुलारी, माजी सरपंच प्रा. उषा मिसाळ , सुमनबाई काळे , रोहिणी निकम , सदस्या स्मिता काळे, लता सोनवणे , राजश्री यादव , सामाजिक कार्यकर्ते कारभारी गरड , पत्रकार नामदेव शिंदे , डॉ. लहानु मिसाळ , येडुभाऊ सोनवणे , अंबादास गोंडे उपस्थित होते.
बाबासाहेब गोर्डे यांनी ग्रामसभेचा उद्देश सांगुन देशातिल कर्तृत्ववान महिलांचा इतिहास सांगीतला.अंबादास गोंडे , विजय फुलारी , देवेंद्र काळे , कारभारी गरड , नामदेव शिंदे , प्रा. उषा मिसाळ आदिंनी मनोगत व्यक्त करुन महिलांना शुभेच्छा दिल्या .
माजी सरपंच सुमन काळे , सखुबाई गोंडे , प्रा.उषा मिसाळ, रोहिणी निकम , माजी उपसरपंच सिमा फुलारी आदिंचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
महिला दिनानिमित्त रिना सचिन अढागळे यांच्या घरकुल बांधकामाचे उदघाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यात शिव्या बंदी करावी आणि विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी असा राज्य शासनाने कायदा करावा यामागणीसाठी सौंदाळा येथील आमरण उपोषणास पाठिंबा देण्याचा ठराव कारभारी गरड यांनी मांडला. त्यास अंबादास गोंडे यांनी अनुमोदन दिले .