नेवासा/सुखदेव फुलारी
महीलांना स्वयंम रोजगार निर्मीतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार दि.८ मार्च रोजी नारी शक्तीचा सन्मान सोहळा तसेच महीला आरोग्य शिबीर व महिला बचत गटांना महीला दिन कार्यक्रमात कर्ज वितरण वाटप आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सौ.रत्नमालाताई लंघे, जिल्हा परिषद सदस्या डॉ.तेजश्रीताई लंघे,नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, कुकाण्याच्या सरपंच लताताई अभंग,उपसरपंच शुभांगी कचरे,ग्रामपंचायत सदस्या हकीमाबी शेख, रोहिणीताई शिंदे,जयश्री लंघे,डॉ.विद्या कोलते,शोभा आलवणे, मंगल काळे,सुरेखा देशमुख,आशा खरे,भारती वालतुरे,भाजपा महीला आघाडी तालुकाध्यक्ष भारती बेंद्रे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,डॉ.बाळासाहेब कोलते,मनोज पारखे,सोमनाथ कचरे, सतीश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आ. लंघे पुढे म्हणाले की,महीलांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण खंबीरपणे नेत्तृत्व करणार असून महीलांना बचत गट चळवळीतून स्वयंमरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देवून घरबसल्या रोजगार निर्मिती करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, ऐतिहासिक नगर जिल्ह्याचे नामकरण महायुती सरकारने अहिल्यादेवी केल्याबद्दल राज्य सरकारचे कौतुकही यावेळी त्यांनी केले. नेवासा तालुक्याचा सर्वांगिन विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्वसामान्य मानसाला केंद्रबिंदू मानून शेवटच्या घटकांपर्यत न्याय देण्याची भूमिका ठेवणार असल्याचेही यावेळी आमदार लंघे यांनी महीला दिन कार्यक्रमात यावेळी बोलतांना केले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने महीला भगिनी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*लाडक्या बहीनींनीच माझा विजय खेचून आणला…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७५ वर्षांच्या वाटचालीत स्वातंत्र्यानंतर या देशात महीलांना समान संधी देवून ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक असा स्तुत्य निर्णय घेतलेला असून लाडक्या बहीनींसाठी केंद्र व राज्य सरकारची भूमिका स्वागर्ताह असून माझा विजय हा लाडक्या बहीनींनीच खेचून आणला.
-आमदार विठ्ठलराव लंघे