नेवासा
नेवासा तालुक्यातील गळनिंब येथील राजकीय चळवळीतील सक्रिय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत रामदास नानासाहेब शेळके पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्ष नेवासा युवक तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांनी दिले.
युवक जिल्हाध्यक्ष विधीज्ञ पांडुरंग औताडे म्हणाले,माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांचे विचार महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात जात धर्म पंथ यामध्ये विभागला जात असताना तिरंगा हा ध्वज सर्वश्रेष्ठ मानून विचारांची लढाई लढणारे एकमेव बच्चूभाऊ आहेत.
जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली सांगळे म्हणाले, प्रहारच्या विचारावर काम करणारी सवंगडी मिळतात हेच आपल्या लढायचं यश आहे.
यावेळी प्रहारचे बाळासाहेब खर्जुले, संदीप पाखरे, अरविंद आरगडे, संतोष मिसाळ,किरण सुभाष शेळके, कल्याण विठ्ठल शेळके,संतोष शेळके, शाखाध्यक्ष कृष्णा पाटील शेळके व परिसरातील नागरिक उपस्थित होते.