नेवासा
अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचा संवेदनशील असणारा तालुका नेवासा पोलीस स्टेशनला अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिवार दि.८ रोजी आकस्मिक भेट दिली.
श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचेसह संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्ग हजर होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या संबंधाने केलेली तयारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची पाहणी केली.
पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन प्रलंबित गुन्हे, हरवलेली माणसे, उघडकीस न आलेले चोरीचे गुन्हे, अवैध धंद्यावरती छापे घालणे सह विविध क्षेत्रातील गुन्हेगारीचा संपूर्ण आढावा घेऊन कामासंबंधी सूचना दिल्या.
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, परंतु आणखी सुधारणा करण्याबाबत अशा व्यक्त केली.
पोलीस अधीक्षक यांनी नवीन पोलीस स्टेशन व पोलिसांच्या निवासस्थान इमारतीची बांधकामाची पाहणी करून आर्किटेक्चर व ठेकेदार यांच्याकडून बांधकाम प्रगती बाबत माहिती घेतली.