अहिल्यानगर/प्रतिनिधी
पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथील सौ.मंदाबाई ठकसेन तुपे यांची सावता सेना महिला आघाडीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दि.८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे व सावता सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्वातीताई गोरे यांनी सौ. मंदाताई ठकसेन तुपे यांची अहिल्यानगर सावता सेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
सौ.मंदाबाई ठकसेन तुपे या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असून त्या मानूर गावच्या १० वर्षे सदस्य होत्या. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांनी त्या काळात वार्डातील अनेक विकासाची कामे केली. सहकाराशी पण नाळ जोडलेली आहे सरकार क्षेत्रात काम करत त्यांनी २०१८ रोजी पासून तेजस्विनी बहुउद्देशीय सर्व सेवा सहकारी संस्था स्थापन केली आहे. त्या या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. तसेच गावांमध्ये बचत गट स्थापन करून महिलांना एकत्र करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्या कामाची पावती म्हणून सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजांजी गोरे व सावता सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्वातीताई गोरे यांनी याची दखल घेऊन त्यांची सावता सेना महिला आघाडी अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या सर्व समाजामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सावता सेनेच जाळ जास्तीत जास्त कसं वाढवता येईल यासाठी काम मी करून दाखवील. संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी निस्वार्थपणे पुर्ण करील अशी ग्वाही सौ.मंदाबाई तुपे यांनी दिली.