गुहा प्रतिनिधी राहुल कोळसे:राहुरी तालुक्यातील गुहा येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यावर्षीच्या यात्रा उत्सवाची गुरुवारी कुस्ती मैदान व नाथ गीतांच्या कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात सांगता झाली.यात्रेचा प्रारंभ मंगळवारी मानाचा नैवद्य व काठी मिरवणूक पार पडली.बुधवारी सकाळी सकाळी होमहवन, गंगाजल पूजन व कावड मिरवणूक नंतर महाआरती दुपारी कानिफनाथ उर्फ कान्होबा देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.यामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सायंकाळी ८ ते ११ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
गुरुवारी २० मार्च रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत सराला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन झाले.यावेळी रामगिरी महाराज म्हणाले की आम्ही कुठल्या धर्माच्या आड येत नाही. पण कुणी धर्माच्या आडून आमच्या जमिनी जर हस्तगत करत असतील, ते आम्ही सहन करणार नाही. वक्फ बोर्डाच्या नावाखाली आमच्या जमिनी लाटण्याचे मनसुबे आम्ही हाणून पाडू, असा इशारा सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी दिला.वक्फ बोर्ड म्हणजे कोर्ट नाही. विशिष्ट धर्माच्या व्यवस्थापनासाठी तयार झालेले हे वक्फ बोर्ड आहे. सरकार हे देशाचे संरक्षण करणारे असले पाहिजे. प्रत्येक जाती धर्माला समान न्याय देणारे सरकार असले पाहिजे, असेही महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांचे फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. यावेळी रामगिरी महाराजांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत भव्य कुस्ती हंगामा पार पडला. सायंकाळी महाआरती झाली. रात्री ८ वाजता नाथभक्त आकाश शिंदे यांचा नाथ गीतांचा कार्यक्रम झाला. यात्रा उत्सवाची यात्रा उत्सव कमिटी व गुहा ग्रामस्थांनी महिनाभरापासून पूर्णतयारी केली होती. यात्रा उत्सवासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नाथ भक्त गुहात आले होते. यात्रा कमिटीच्या वतीने कानिफनाथ मंदिर व गुहा गावातील मुख्य मंदिरांना तसेच गावातील सर्वच मुख्य रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली.मंदीर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली.यात्रा कमिटीच्या वतीने भाविकांना सुसज्ज अशी दर्शन रांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.महसूल प्रशासनाचे सहकार्य मिळाले.
यात्रा यशस्वीततेसाठी कमिटीचे अध्यक्ष अतुल कोळसे,उपाध्यक्ष रवींद्र डौले ,खजिनदार अनिल सौदागर सह खजिनदार अनिकेत कोळसे ,सचिव मच्छिंद्र आंबेकर, सहसचिव अमोल भांड ,मंदिर व्यवस्थापन – साईनाथ पवार कार्यक्रम व्यवस्थापक सचिन लांबे,सहमंदिर व्यवस्थापक वैभव लांबे,सदस्य – अमोल तारू, अजय मांजरे, वैभव शिंदे, राहुल उऱ्हे, मुकेश चंद्रे, अमोल कोळसे ,हर्षद कोळसे, शंकर वाबळे,सदस्य अशोक कोळसे, रुपेश सौदागर, सचिन खपके, योगेश वर्पे,बापू कुचेकर,संतोष खराडे, बाळासाहेब शिंदे,मगेश काकडे, रामा मदने, सागर लांबे,मगेश गवांदे, संकेत कोळसे , गौरव डौले आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.यात्रा उत्सव व्यवस्थित शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल कमिटीने सर्वाचे आभार मानले.