नेवासा
सध्या अस्तित्वात असलेले पाण्याचे स्रोत व प्रकल्पातील पाणीसाठा याला काही मर्यादा असल्याने जल स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात छोटी-मोठी जलसंधारणाची कामे करून पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची उत्पादकता वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.
नेवासा तालुक्यातील पाथरवाला माध्यमिक विद्यालयात शनिवार दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनामित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे मुळा पाटबंधारे उपविभाग चिलेखनवाडी यांचे वतीने कार्यकारी अभियंता सायली पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित जलजागृती सप्ताह सांगता कार्यक्रमात शालेय जलसाक्षरता, पाण्याची बचत व संवर्धन काळाची गरज याविषयावर मार्गदर्शन करताना श्री.फुलारी बोलत होते.
उपविभागीय अभियंता संदीप पवार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
माजी सरपंच दत्तात्रय खाटिक, मुख्याध्यापक रमेश खाटीक, सरपंच हरिभाऊ थोरे, शिवनाथ थोरे, राम खाटीक, देविदास खाटीक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप झिरपे,पांडुरंग खाटीक, लहू खाटीक, बाबुराव म्हस्के, अध्यापक सुनिल पंडित,
चंद्रकांत गुंड, ईस्माइल शेख, चंद्रकांत कचरे, संदिप लिपणे,बाळासाहेब म्हसरूप, शाखा अभियंता जितेंद्र कावले,बिरबल दरवडे,अतुल गायकवाड आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी,शेतकरी व ग्रामस्थांनी पाणी आडवा-पाणी जिरवा, पाण्याची बचत-काळाची गरज, ‘जल है तो कल है या घोषणा देत गावामधून जलजागृती फेरी काढली.
श्री.फुलारी पुढे म्हणाले की,उपलब्ध पाणी साठा किती आहे आणि पिक,मानुस,
पशु-पक्षी यातील कोणत्या घटकासाठी नेमके किती पाणी लागते याची आपल्याला माहिती असेल तर पाण्याचे योग्य नियोजन करणे सोपे होते.
पारंपारिक प्रवाही सिंचन पद्धतीत बदल करुन सूक्ष्मसिंचनाचा अवलंब केल्यास ४० टक्के पाण्याची बचत होते. प्रकल्पातील पाणी शेतीला देणे आणि त्याचे सिंचन व्यवस्थापन करणेसाठी
महाराष्ट्र सिंचन पद्धती शेतकरी व्यवस्थापन कायदा २००५ अस्तित्वात येऊन पाणी वापर संस्था स्थापन झाल्या. सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे,पाणी व्यवस्थापनात सुधारणा करणे,सिंचन योजना प्रभावीपणे राबवणे,पाणी वापराची कार्यक्षमता वाढवणे हा यामागील उद्देश आहे.या कायद्यामुळे, सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे.पाणी व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून थेट सहभाग मिळतो. सिंचन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मदत होते. शेतकऱ्यांना पाणी हक्कदारी व पिक स्वातंत्र्य मिळते.
उपविभागीय अभियंता संदीप पवार, दत्तात्रय खाटीक, अध्यापक सुनिल पंडित, कालवा निरीक्षक संतोष राऊत यांनी ही मनोगत व्यक्त केले.
मुळा पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक श्रीकांत करंजे,संतोष राऊत,
पोपट दरंदले,शिपाली चव्हाण,विकास घोक्षे, सुमेध कोरडे,बापु काळे, वरिष्ठ लिपिक फिरोज पठाण,मोजणीदार नितीन लांडे,संतोष राऊत, अतुल गायकवाड, दप्तर कारकुन करिश्मा शिंगाडे, योगेश म्हस्के,आरेखक वैभव पावडे, कर्मचारी शुभाष गायकवाड,गवाजी शिरसाठ, श्रीमती शांताबाई म्हस्के यांचेसह कालभैरव पाणीवापर संस्था सुलतानपुर, सिद्धीविनायक पाणी वापर संस्था पाथरवाला,शाकंभरी देवी पाणी वापर संस्था सुकळी या संस्थाचे पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
मोजणीदार नितिन लांडे यांनी प्रास्ताविकातून जलदिन व जलजागृती सप्ताहाचा उद्देश विषद केला.
कालवा निरीक्षक रावण ससाणे यांनी जलगीत सादर करून उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.