नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा-देवगांव शिवारात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे दिसून आल्याने या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावला पिंजरा असल्याची माहिती वनरक्षक स्वप्नाली मडके यांनी दिली.
याबाबद अधिक माहिती अशी की, दि.१४ मार्च रोजी रात्री भेंडा बुद्रुक येथील देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या कुत्र्याचे दुसऱ्या दिवशी निधन झाले.तर त्याच रात्री अभिजीत बबन मिसाळ यांच्या पाळीव कुत्र्यावर ही बिबट्याने हल्ला करून ठार मारले.
दुसऱ्या दिवशी दि.१५ रोजी
रात्री किरण भाऊसाहेब मिसाळ यांच्या
बोकड बिबट्याने फस्त केला.
रविवार दि.१५ रोजी भर दुपारी ४ वाजता भेंडा-जेऊर रस्त्यावर बिबट्याचा मुक्तसंचार दिसून आला.
तसेच गेल्या आठवड्यात सातत्याने भेंडा-देवगांव शिव रस्ता शिवारात ही बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला.
त्यामुळे भेंडा-देवगांव शिवारातील
शेतकरी व नागरिक भयभीत झालेले आहे. उस-केळी बिबट्याच्या भीतीने मजूर शेतात काम करीना आणि शेतकऱ्यांन रात्री पिकांना पाणी देता येईना,त्यामुळे वन विभागाने त्वरित पिंजरा लावून
बिबट्याचा बंदोबस्त करवा अशी मागणी होत होती.शेतकऱ्यांनी वनविभागाकडे यबाबद पाठपुरावा केला होता.
त्यानुसार वनविभागाचे *वनपाल वैभव गाढ़वे याचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक स्वप्नाली मडके व वनकर्मचारी सयाजी मोरे* यानी रविवार दि.२३ रोजी दुपारी देवगांव शिवारातील शेतकरी गोविंद शिवराम देवतरसे यांच्या
गट नंबर ९७ मधील उसाच्या शेताजवळ पिंजरा लावून त्यात बकरीला भक्ष म्हणून ठेवून बिबट्याला जेरबंद करण्याची तयारी पूर्ण केली आहे.बाळासाहेब वाघ, बाळासाहेब जाधव, श्रीकांत ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, गणेश आगळे हे शेतकरी यावेळी उपस्थित होते.
*बिबट्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल….*
* शेतात जाताना हातात काठी, कोयता, कुऱ्हाड किंवा एखादे हत्यार ठेवावे.
*उसाच्या किंवा उंच पिकाच्या शेतातून जात असताना मोठ्याने आवाज करत किंवा गाणे गात चालावे.
*रात्री अपरात्री शेतात जात असताना बॅटरी सोबत असावी,जेणे करून बिबट्या उजेडापासून लांब जाईल.
*शेतात वाकून काम करणे टााळले पाहिजे. वाकून काम करत असलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.
*ज्या ठिकाणी जनावरे बांधले जातात त्या ठिकाणी बंदिस्त गोठा आणि लाईटची व्यवस्था करावी. बिबट्या अंधारात शिकार करतो त्यामुळे उजेड असला तर बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता कमी असते.
*बिबट्याची चाहूल लागताच कुत्रे भुंकतात त्यामुळे बिबट्यापासून संरक्षण होऊ शकते, पण झोपलेल्या कुत्र्यावरही बिबट्या हल्ला करतो
*बिबट्याचा वावर आढळल्यास वनविभागाला संपर्क साधून माहिती द्यावी.
*पिंजरा लावलेल्या परिसरात लहान बालक,महिला यांनी जाऊ नये.
-स्वप्नाली मडके
वनरक्षक,नेवासा