अहिल्यानगर/प्रतिनिधी
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर “त्रिवेणी”, पंचीग स्टेशन रोड, महालक्ष्मी गार्डन जवळ, भुतकरवाडी, सावेडी , अहिल्यानगर येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या अभ्यासकांसाठी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधिसाठी विनामुल्य प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुक अभ्यासकांनी फोटो, पदवी / पदवीत्तर गुणपत्रक व आधार कार्ड छायाप्रत यास त्वरीत संपर्क साधावा. प्रवेश् मर्यादीत असल्याने प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या अभ्यासिकेची वेळ सोमवार ते शुक्रवार शासकीय सुट्या वगळून सकाळी 10.30 ते सायं 5.30 असणार आहे. ग्रंथालयात एकूण 29 हजार ग्रंथसंपदा असून सर्व पंथाची ई-ग्रंथालय सॉफ्टवेअर मध्ये नोंद करण्यात आलेली आहे. वेव ओपेंक / eg4 द्वारे मोबाईलवर ग्रंथ शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
वैयक्तिक ग्रंथ वाचक सभासद नोंदणी सुरू आहे. वैयक्तिक सभासद होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत
अनामत रक्कम 500/- द्विवार्षिक वर्गणी रक्कम रु 100/- प्रवेश व अर्ज शुल्क 10/- एकूण रक्कम रू. 610/- भरून वाचक सभासद होता येते. आवश्यक कागदपत्रेने दोन फोटो व आधार कार्ड, ग्रंथालयात बसुन वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, ग्रंथ देवाण घेवाण वेळ -सोमवार ते शुक्रवार शासकीय सुट्या वगळून सकाळी 10.30 ते सायं 5.30
जिल्हा ग्रंथलाय अधिकारी कर्यालयामार्फत १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमे अंतर्गत जनतेमध्ये वाचनाची आवड वाढविण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर मार्फत – साखळी योजना राबविण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत, सार्वजनिक ग्रंथालय, शाळा, ग्रामपंचायती, महिला मंडळे, युवक मंडळे, यांना रु. 2500/- अनामत व रु. 750/-प्रवेशशुल्क (दोन वर्षासाठी) अर्ज रक्कम रु. 25/- भरून संस्था सभासदत्व दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत संस्था सभासदांना साधारणपणे 25 ग्रंथांचा एक संच देण्यात येणार आहे. 1 ते 2 महिने मुदतीनंतर संच बदलून दिला जाईल. संबंधित संस्थांना स्थानिक देवघेवीची व ग्रंथ परतीची जबाबदारी पार पाडावी लागेल. केंद्रावरील वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ग्रंथसंख्या वाढविण्यात येईल.
सदर योजनेचे 16 एप्रिल 2025 पर्यंत किमान 100 सभासद करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी संस्था नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचा ठराव यासह जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय त्रिवेणी, पंपिंग स्टेशन रोड, महालक्ष्मी उद्यानाजवळ, भूतकरवाडी सावेडी, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा.या योजनांचा जास्तीत जास्त नागरीक अभ्यासक , सार्वजनिक ग्रंथालये,शाळा महाविद्यालये महिला मंडळे,युवक मंडळे, यांनी लाभ घ्यावा. असे आव्हान अशोक गाडेकर प्र.ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे. अधिक माहिती साठी ग्रंथालय निरीक्षक, रामदास शिंदे यांच्याशी 9404801694/ 8329295236 या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधावा.