नेवासा
केंद्र व राज्य शासनाकडुन मिळणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचे २०२३-०२४ या वर्षातील ६ कोटी १५ लाख २७ हजार रुपयांचे एकणु १६०० शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकरी या अनुदानाच्या प्रतिक्षेत असून १ वर्षापासुन ठिबक सिंचन करण्यासाठी पुर्वसंमती मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित ठिबक सिंचन योजनेचे अनुदान व पुर्वसंमती मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे नगर जिल्हाध्यक्ष
अंकुश रंगनाथ काळे यांनी पालक मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांना दिलेल्या निवेदनात श्री.काळे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाकडुन मिळणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचे २०२३-०२४ या वर्षातील ६ कोटी १५ लाख २७ हजार रुपयांचे एकूण १६०० शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकरी या अनुदानाच्या प्रतिक्षेत १ वर्षापासुन आहे. व १ वर्षापासुन ठिबक सिंचन करण्यासाठी पुर्वसंमती मिळालेली नाही .
पाण्याची बचत करुन अल्प पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन वाढ व्हावी या हेतुने ठिबक सिंचन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान सुरु केले त्यामुळे जास्त पाणी लागणाऱ्या उसालाही शेतकरी ठिबकच्या सहाय्याने पाणी देऊ लागले. परंतु गेल्या वर्षापासुन ठिबकचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. केंद्र व राज्य शासनाचा ६०/४० चा हिस्सा असलेल्या सुक्ष्म सिंचन योजनेतुन ठिबक सिंचनाच्या माध्यमातुन पिकाला पाणी देण्याची व्यवस्था केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चाला ८० टक्के रक्कम अनुदान म्हणुन दिली जाते. यामध्ये पिकनिहाय अनुदानाच्या रकमेत बदल होतो. तालुक्यातील सर्व शेतकरी ठिबक सिंचन अनुदानाची वाट पहात आहे. तरी कृपया ठिबक सिंचन योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करावे.आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, बंडू शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.