Tuesday, April 22, 2025

अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाचा  सगल ५ व्या वर्षी १०० टक्के पाणीपट्टी वसुलीचा विक्रम

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

जलसंपदा विभागाचे अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाने ३१ मार्च २०२५ अखेर सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली करून पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला असून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२४३.७२ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट असताना ही २९७४.४९ लाख रुपयांची (२३९.१६ टक्के) वसुली केल्याची माहिती कार्यकारी अभियंता कु. सायली पाटील यांनी दिली.

अधिक माहिती देताना कु. पाटील यांनी सांगितले की, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर या विभागाने आतापर्यंतची सर्वात जास्त व विक्रमी सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली करून पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासाठी विभागातील प्रत्येकाने आपापले योगदान दिले आहे. त्यामुळे आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करू शकलो. मागील दोन वर्षांपासून सातत्याने विक्रमी पाणीपट्टी वसुली करीत आहोत. सलग ५ व्या  वर्षी आपण १०० टक्क्यांपेक्षा जास्त वसुली करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्व उपविभागीय अभियंता, अधिकारी, शाखाधिकारी, कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी, विभागीय कार्यालयातील आणि उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांचे आभार. तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता व प्रशासक तसेच वसूली कामी  सहकार्य करणाऱ्या सर्व सिंचन व बिगर सिंचन संस्था आणि लाभधारकांचेही मनःपूर्वक आभार भविष्यात देखील सर्वांकडून पुनश्च कामगिरी होईल, अशी खात्री असल्याचेही पाटील म्हणाल्या.

२०२४-२५ या आर्थिक वर्षात  वसुलीचे उद्दिष्ट व प्रत्यक्ष झालेली वसुली अशी…

————————————————
तपशील–उद्दिष्ट (रु.लक्ष)–साध्य उद्दिष्ट(रु.लक्ष) — वसूली टक्के
————————————————–
सिंचन– २०१.६७ — २४५.०८–१२१.४३ %

बिगरसिंचन–१०४२.०५– २७२९.४१– २६१.९३ %
————————————————-
एकूण–१२४३.७२–१९७४.४९– २३९.१६%
————————————————–

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!