नाशिक/सुखदेव फुलारी
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे पालखेड पाटबंधारे विभागाने अलग ५ व्या वर्षी ३१ मार्च २०२५ अखेर सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी १०० टक्के वसुलीचा विक्रम प्रस्थापित केला असून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १६७५.७८ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट असताना ही २२६३.६६ लाख रुपयांची(१३५.०८ टक्के) वसुली केल्याची माहिती कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली.
अधिक माहिती देताना श्री.भागवत यांनी सांगितले की,पालखेड पाटबंधारे विभाग मागील चार वर्षांपासून सातत्याने विक्रमी पाणीपट्टी वसूली करीत आहे. सलग पाचव्या वर्षी देखील १०० टक्क्यांपेक्षा अधिक वसूली केली आहे.
उद्दिष्टपूर्तीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व सहाय्यक अभियंता श्रेणी-१, उपविभागीय अभियंता-अधिकारी, शाखाधिकारी, कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी तसेच विभागीय कार्यालयातील आणि उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन.तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता व प्रशासक,सिंचन व बिगर सिंचन संस्था आणि लाभधारकांचे मनःपूर्वक आभार.
*२०२४-२५ या आर्थिक वर्षात वसुलीचे उद्दिष्ट व प्रत्यक्ष झालेली वसुली अशी…*
———————————————-
तपशील–उद्दिष्ट (रु.लक्ष)–साध्य उद्दिष्ट(रु.लक्ष) — वसूली टक्के
———————————————–
सिंचन–१२२.६८–१५३.१६–१२४.८५ %
बिगरसिंचन– १५५३.१०–२११०.५०–१३५.८९ %
———————————————–
एकूण–१६७५.७८–२२६३.६६–१३५.०८ %
———————————————–