नेवासा
देशाला-धर्माला महत्त्व द्या. नेत्यांकडे जावयाच्या बदली करता जाऊ नका तर गावातील सार्वजनिक कामाकरिता, सगळ्यांच्या हिता करिता जा. सगळ्यांच्या हिता करिता नेत्यांकडे आणि सर्वांचे सुखाकरिता संतांकडे जायचे आहे. मंदिराच्या माध्यमातून सुसंवाद साधत राहिला पाहिजे. देशात सुसंवादाचा,आपुलकीचा आणि श्रद्धेचा मार्ग दृढ व्हावा यासाठीच मंदिरे आहेत. मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता म्हणजे मंदिर. देश सुजलाम-सुफलाम व्हावा, सर्व जातीधर्मातील जनता सुसंवादाने राहावी आणि सर्वांना आनंद प्राप्त व्हावा याकरिता मंदिरांची निर्मिती असते असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे महंत भास्करगिरीजी महाराज यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोउत्सवानिमित्ताने हनुमान
होणाऱ्या कीर्तन मोहत्सवाचे धर्मध्वजारोहण भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
आमदार विठ्ठलराव लंघे,महंत सुनीलगिरी महाराज,मंहत आप्पा महाराज, रमेशानंदगिरी महाराज,अंकुश महाराज कादे,ऋषीनाथ महाराज, बाळू महाराज कानडे,काशिनाथ नवले, तुकाराम मिसाळ, बाळासाहेब नवले,अशोकराव मिसाळ,बापूसाहेब नजन, बबनराव धस, गणेश कुलकर्णी, संभाजी मिसाळ, वाल्मीक लिंगायत, कल्याण मिसाळ, रमेश आरणे, आकाश मिसाळ, संदीप फुलारी, दादासाहेब गजरे, अंबादास गोंडे,रामचंद्र गंगावणे,रंगनाथ गव्हाणे, शिवाजी फुलारी, राम गरड, विलास फुलमाळी, गुलाब फुलमाळी आदी यावेळी उपस्थित होते