नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक
शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.सोमवार दि.७ एप्रिल रोजी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे सरपंच सुहासिनी मिसाळ यांचे हस्ते झाले.
युवा नेते अब्दुल शेख,केंद्रप्रमुख,अंकुश महाराज कादे, केंद्र प्रमुख रवींद्र कडू, प्रा.उषा मिसाळ, किशोर मिसाळ, जलमित्र सुखदेव फुलारी,कृष्णा गव्हाणे, अशोक पंडित, देविदास गव्हाणे, अड.रवींद्र गव्हाणे,डॉ. लहानू मिसाळ, विलास देशमुख,संतोष गव्हाणे,किशोर मिसाळ, देविदास गव्हाणे, दत्तू गव्हाणे, सुखदेव आरोळे, रामचंद्र गजभार विनोद गव्हाणे, विष्णू फुलारी, पत्रकार संतोष औताडे, बाबासाहेब गोर्डे, राजेंद्र गोर्डे, अंबादास कोरडे, भारत गवळी, विजय अंधारे सर, दशरथ ढोले, संजकुमार लाड,संतोष भोपे,अरुण गोर्डे, भाऊसाहेब फुलारी, संदीप भंडारे, किरणकुमार दहातोंडे, संदीप दहातोंडे, फुलारी, साईनाथ गोंडे, आदी यावेळी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम अत्यंत सुबक,देखणा व रंगतदार झाला.
शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, पालकांनी
अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमाची मांडणी केली होती. गाण्याची निवड व नृत्य दिग्दर्शन अत्यंत सुंदर होते. विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य व अभिनय केला. विद्यार्थ्यांची वेशभूषा, साऊंड सिस्टिम, स्टेज डेकोरेशन सर्वच अप्रतिम होते.
यावेळी बोलताना युवा नेते अब्दुल शेख म्हणाले की,मराठी शाळेतील मुलांमधे गुणवत्ता आहे. मुलांवर खरे संस्कार येथेच होतात. भैया सामाजिक प्रतिष्ठान मार्फत सर्व मुलांना आरोग्य कार्डचे वाटप करू.
प्राध्यापक सौ.उषा मिसाळ यांनी आपल्या मनोगतात भेंडा बुद्रुक शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल शिक्षकांचे कौतुक केले.
स्पर्धा परीक्षेत बसलेल्या १५ पैकी १३ विद्यार्थी यशस्वी झाले,त्यापैकी ४ विद्यार्थी जिल्ह्या गुणवत्ता यादीत निवड झाली. यासर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान झाला.
स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुनिल गायकवाड यांनी केले.शिक्षिका श्रीमती राजश्री यादव यांनी आभार मानले.