नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेने नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजने अंतर्गत घेतलेल्या विमा पॉलिसी मधून संस्थेचे खातेदार खातेदार ज्ञानदेव किसन गायकवाड यांना दवाखाना उपचार खर्चाची मदत म्हणून २३ हजार ७८ रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
संत नागेबाबा मल्टीस्टेट भेंडा शाखेतील खातेदार ज्ञानदेव किसन गायकवाड यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून चालू केलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेमध्ये ९०० रुपये भरून नाव नोंदणी केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा रस्ता अपघात झाला. त्यासाठी त्यांचा दवाखाना उपचारासाठी २३,०७८ रुपये खर्च झाला.या दवाखाना उपचार खर्चाच्या रकमेचा धनादेश वाकडी गावचे पोलीस पाटील भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते
त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
वाकडीचे उपसरपंच भाऊसाहेब भडके, गणेश काळे, गोरक्षनाथ भडके, लक्ष्मण काळे, राजेंद्र काळे, नानासाहेब गायकवाड, बाळासाहेब काळे, कल्याण काळे,नागेबाबा मल्टीस्टेटचे भेंडा शाखाधिकारी संतोष सापते,लक्ष्मण थोरात,श्री.सय्यद , सुधाकर गायकवाड
आदी यावेळी उपस्थित होते.