नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून स्वच्छता दूत म्हणून परिचित असणारे
६० वर्षे वयाचे राम नावाने परिचित असलेले रावसाहेब लक्ष्मण होन यांचे श्रीराम नवमीच्या दिवशी दुपारी १२.०५ दरम्यान निधन झाले. होन यांच्या निधनाने
स्वच्छतेचा ‘राम’ हरपल्याची भावना शिरेगाव मध्ये व्यक्त होत आहे.
गेली अनेक वर्षांपासून शिरेगावची स्वच्छतेची सेवा ‘राम’ यांचे कडून होत असे. पाऊस पाणी, ऊन वारा या याची तमान बाळगता दैनंदिनी राम स्वच्छतेचे पाऊल उचलत होते. श्री गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व त्यांना गुरुस्थानी मानून रोजची दैनंदिनी सेवा ते करत असे.
गावातील मारुती मंदिराचा प्रांगण, वेशी समोरील परिसर व रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमीची जागा व त्याचा परिसर आशा अनेक ठिकाणी राम दैनंदिन स्वच्छता करायचा, रामच राहण्याच ठिकाण म्हणजे मारुती मंदिर. त्याच ठिकाण त्याने अखेरचा निरोप घेतला, दोन उंच बांबू वर पाय ठेवून पंढरपूरची वारी करत असे.
स्वच्छता दूत म्हणूनच माझा जन्म झाला असे तो नेहमी म्हणत असे. परिसराची व गावाची स्वच्छता राम नेहमी नेटाने करत असे, रात्री उशिरापर्यंत त्याची झाड लोट सुरू असे, विशिष्ट ठिकाणी कचरा नेहून तो पेटून देत असत, आज श्रीराम नवमीच्या दिवशीच राम ने जगाचा निरोप घेतला, रोजचा उदरनिर्वाह जे कोणी त्याला मदत रुपी रक्कम देईल तो त्यावर बघावत असे, कधी कोण समोर त्याने हात पसरवला नाही, आज खऱ्या अर्थाने शिरेगाव कराचा स्वच्छतादूत हरपला आहे, अंत्यविधीसाठी परिसरातील व शिरेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य मिरवणूक काढून व सजवलेल्या रथात ‘राम’ला शेवटचा निरोप देण्यात आला.
आम्हा शिरेगावकरांसाठी ‘राम’ एक स्वच्छता दूत म्हणून नेहमी लक्षात राहील. त्याच्या निधनाने शिरेगावकर पोरके झाले आहे. राम यांची नेहमी प्रत्येक कार्यात उणीव भासत राहील हे नक्की आहे.
– अविनाश जाधव
ग्रामस्थ,शिरेगाव