नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.संभाजी काळे यांची अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या कार्यकारी मंडळ सदस्यपदी निवड झाली आहे.
डॉ.संभाजी काळे हे जिजामाता कला व शास्त्र महाविद्यालयात ३१ वर्षे सेवेत आहेत. विभागप्रमुख व उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.त्यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या कार्यकारी मंडळ सदस्य पदी एकमताने निवड करण्यात आली.
डॉ.काळे हे 1998 पासून अर्थशास्त्र परिषदेचे अजीव सदस्य असून ते अर्थशास्त्र परिषदेमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात व सहभागाबरोबर संशोधन पेपर सादर करून सादरीकरण केले जाते. मराठी अर्थशास्त्र परिषद देशातील व आंतरराष्ट्रीय विषयावर विचार मंथन करून त्यासंबंधी शासनाला आपले अभिप्राय व शिफारशी देत असते. या अर्थशास्त्र परिषदेमध्ये अनेक ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञांनी अध्यक्ष पद भूषवलेले आहे, यामध्ये श्री वि. म. दांडेकर ,डॉ भालचंद्र मुणगेकर याबरोबर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष पद भूषवलेले आहे. मराठी अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्रीय सिद्धांत अर्थव्यवस्था देशाचा आर्थिक विकास तसेच अर्थशास्त्रज्ञांची विचार यांचा विचार करून वर्तमान अनेक ज्वलंत विषयावर चर्चासत्रे, परिषदा घेत असते. याबरोबरच अनेक विषयावर लिखाण करून त्यासाठी पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. भारतीय नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा मागे व घेण्यासाठी यावर विचार मंथन करून परिषदांमध्ये विचार मांडले जातात व भविष्यकालीन आर्थिक धोरणे व शासनाला मार्गदर्शक शिफारशी देण्याची काम केले जाते.
डॉ.काळे हे यापूर्वी २०१९ ते २०२२ या कालावधीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व विद्या परिषद म्हणून देखील काम पाहिले आहे. तसेच त्यांची ६० राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर सादरीकरण केलेले असून त्यांची अभ्यासक्रम व संदर्भ म्हणून २६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचा दीर्घ संशोधन प्रकल्प व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा लघु संशोधन प्रकल्प कार्य पूर्ण झालेले आहे. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले तदर्थ अभ्यास मंडळावर देखील अभ्यास मंडळ सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे .
सध्या ते मुंबई विद्यापीठ, ठाकूर महाविद्यालय पनवेल व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथील अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत आहे. पीएच.डी संशोधनामध्ये ०८ विद्यार्थ्यांनी आपली पीएच.डी पदवी व एमफिल ११ विद्यार्थ्यांनी पदवी डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेली आहे.
प्रोफेसर काळे यांनी इंग्लड (लंडन), फ्रान्स( पॅरिस), कॅनडा (टोरंटो), हवाई (होणेंलुलू ),स्वित्झर्लंड( झुरीच ),अमेरिका ,कॅलिफोर्निया (सियाटल) इथे संशोधन पेपर सादर केले आहेत व भेटी दिलेल्या आहे. याबरोबरच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, केंब्रिज विद्यापीठ येथेही भेटी दिल्या आहेत .
त्यांच्या या निवडीबद्दल श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील, माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, डॉ.क्षितिज घुले पाटील , माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील तसेच मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ.विलास खंदारे ,माजी अध्यक्ष प्रा.अनिल कुमार वावरे, डॉ. दिलीप अर्जुने व सर्व माजी अध्यक्ष ,विश्वस्त , सर्व कार्यकारणी सदस्य ,प्राचार्य व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.