नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील वाशिम गावचे प्रगतशील शेतकरी शिवाजीराव सोनवणे यांनी उन्हाळी हंगामात तीळ पिक घेवून
एकरी ५६ हजारांचे उत्पन्न मिळविले आहे.
यबाबद अधिक माहिती देताना शेतकरी सोनवणे म्हणाले की, मागील वर्षी आपण तिळाची (हावरी) नवीन जातीचे पिक घेतले. सेंद्रिय खते व रासायनिक खतांचा समतोल वापर केला. तणनाशकांचा वापर आणि एकात्मिक किड नियंत्रण केल्यामुळे एकरी ६ क्विंटल एकरी उत्पादन मिळाले. त्याला प्रति क्विंटल १५ हजार रुपये भाव मिळाला. त्यामुळे एका एकरातून ९० हजार रुपये मिळाले, एकरी ३४ हजार रुपये खर्च झाला. त्यातून एकरी ५६ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. त्यामुळे यावर्षी ही २ एकरावर उन्हाळी हंगामात पुन्हा तिळाचे पीक घेतले आहे.
डॉ. अशोकराव ढगे यांनी शेतावर जाऊन
त्यांच्या तिळ पिकाची पाहणी केली.
संतोष क्षीरसागर, दत्तात्रय डोळे, जालिंदर चौधरी, भारत खंडागळे, विकास शिनारे यावेळी उपस्थित होते.
*तिळ पीकातून चांगला फायदा…
नेवासा तालुक्यात उन्हाळी हंगामात पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी उन्हाळी बाजरी व भुईमूग पीक घेतात तथापि प्रगतशील शेतकरी शिवाजीराव सोनवणे यांनी मागील वर्षी व चालू वर्षी सुद्धा तिळाचे पीक घेतले आहे व त्यांना चांगला फायदा झाला आहे.
-लक्ष्मणराव सुडके
कृषी अधिकारी
*उन्हाळी हंगामातील पीक रचनेतील बदल फायदेशीर…
श्री.सोनवणे यांना तिळ पिकातून चांगला नफा झाला, हा पीक रचनेतील बदल त्यांना फायदेशीर ठरला आहे.
-डॉ.अशोकराव ढगे
कृषी शास्त्रज्ञ,नेवासा