नेवासा
शेतकऱ्यांची कर्ज माफी करा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने दि.११ रोजी मध्यरात्री १२ वाजता आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या शिरसगाव येथील ‘ पैलतीर’ निवासस्थानासमोर मशाल आंदोलन करण्यात आले.
दरम्यान आंदोलकांचे निवेदन व त्यांच्या भावना सरकारकडे मांडू आणि कर्जमाफीचा लवकरात लवकर निर्णय कसा होईल यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करू असे आश्वासन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिले.
प्रहार जनशक्ति पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सांगळे यांच्या नेतृत्वात
आ.लंघे यांच्या निवासस्थानासमोर मशाल आंदोलन करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी करावी, पेरणी ते कापणी पर्यंतचा खर्च महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मधून करावा,
दिव्यांग बांधवांना ६ हजार रूपये मासिक मानधन देण्या बाबतचे निवेदन आ.लंघे यांना देवून यावर विधान सभेमध्ये आवाज उठवावा व रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजुर करून सर्व शेतकरी व दिव्यांगा बांधवाना न्याय द्यावा अशी मागणी प्रहार आंदोलकांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना आ.लंघे पुढे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारने संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक आमदारांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले. लोकशाही मार्काने प्रारणे माझ्याही निवासस्थानासमोर आंदोलन करून त्यांच्या भावना मांडल्या. निवेदन व त्यांच्या भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे मांडू.कर्जमाफी बाबद लवकरात लवकर निर्णय कसा होईल याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.
प्रहारचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे,जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाखरे,
युवक जिल्हाध्यक्ष अड. पांडुरंग औताडे, जिल्हासंपर्क प्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हासंघटक जालिंदर आरगडे,
किसान आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे,
कार्याध्यक्ष प्रहार अनिल विधाटे, नेवासा
तालुका उपप्रमुख पांडुरंग नवले,
धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष नागनाथ आगळे, सोशल मिडिया प्रमुख आदिनाथ नवले,अमोल जोगदंड, अशोकराव खराडे,दादा धनगर, रामदास शेळके, विकास कोतकर,रामहरी शिरसाठ, किशोर पुंड ,संतोष मिसाळ,गणेश जामदार, चंद्रकांत कदम, संदीप गोरे, मधुकर शिंदे, संजय भंणगे, सचिन साबळे,दत्तात्रय देवढे, शशिकांत चावरे, रमेश शिरसाठ, श्याम लिपणे संदीप जाधव, प्रताप उभेदळ आदि यावेळी उपस्थित होते.
नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार लंघेंच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.