शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील खरडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर शेतकरी विकास पॅनलचे मच्छिंद्र विष्णु आमटे, अन्शीराम कोंडीराम बोडखे, नानासाहेब श्रीपती बोडखे, भाऊसाहेब लक्ष्मण बोडखे, मुरलीधर वामन तेलुरे, मंगल ज्ञानदेव
कुसारे, सुरेश गिताराम बोडखे, कुसुम रामकिसन बोडखे, मच्छिंद्र रंगनाथ लबडे,
रघुनाथ तात्या लबडे, बंडु नामदेव बोडखे, सकाहरी भानुदास बोडखे, अंबादास पांडुरंग ढाकणे हे उमेदवार निवडून आले होते.
या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा रविवार दि.१३ एप्रिल रोजी जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संजय कोळगे,काकासाहेब लबडे,
दीपक बोडखे, शिवाजीराव बोडखे, गोरक्षनाथ काकडे, विष्णुपंत बोडखे, दादासाहेब बोडखे, गोरख भोसले, सुनील बोडखे यावेळी उपस्थित होते.