शेवगाव/प्रतिनिधी
ढोरजळगाव मधून सर्वात जास्त अधिकारी होण्याचे प्रमाण आहे. प्रकाश पाटेकर याने ढोरजळगावसह परिसरातील आणि तालुक्यातील आदर्श उभा केला आहे. प्रशासकीय सेवेत ढोरजळगाव पॅटर्न प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा ठरत असल्याचे प्रतिपादन माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव
येथील प्रकाश गोरख पाटेकर यांची भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कृषी विद्यापीठ पुसा (बिहार) येथे वैज्ञानिक सहप्राध्यापक (वर्ग१) पदीनिवड झाल्याबद्दल माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सन्मान करण्यात आला.त्यावेळी श्री.घुले बोलत होते.
श्री.घुले पुढे म्हणाले की, जिद्द ,चिकाटी,मेहनत आणि सातत्य याच्या जिवावर संकटावर मात करून अखेर प्रकाश पाटेकर यांची ही निवड झाली. या निवडीची शेवगाव तालुक्यातील सर्वाना अभिमानास्पद आहे. प्रशासकीय सेवेत आता तालुक्यासह जिल्ह्यात ढोरजळगाव पॅटर्न दिसत आहे.सर्वात जास्त अधिकारी याच मतीत घडत आहेत. प्रकाशने ढोरजळगावसह परिसरातील आणि तालुक्यातील आदर्श उभा केला आहे. त्याचा हा खडतर प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा आहे. सर्व गावकरी आणि पंचक्रोशीने व नातेवाईक यांनी सत्कार समारंभ आयोजित केला याबद्दल सर्व गावकरी आणि नातेवाईकांचे मनःपूर्वक अभिनंदन. विद्यार्थ्यांचे योग्य ते कौतुक झाल्यास प्रत्येकालाच पुढील कार्यासाठी, वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळत असते. विद्यार्थी हे पुढील भवितव्य असल्याने त्यांना प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी बापूसाहेब पाटेकर ,संजय कोळगे, सुधाकर लांडे, आरगडे भाऊसाहेब, गणेश कराड,अनंता उकिर्डे,मच्छिंद्र म्हस्के, मोहनराव उकिर्डे, देविदास पाटेकर, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी,भरत वांढेकर,राजेंद्र देशमुख, बाळासाहेब कराड,महादेव पाटेकर, भाऊसाहेब चेके, रामभाऊ पाटेकर, भाऊसाहेब कराड,डॉ. अभिजीत कराड, महेश काळे, विष्णुपंत नवले, शहादेव खोसे, साईनाथ गरड याचेसह विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ आदी उपस्थीत होते.