नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील जाणता राजा ग्रुप,सावता परिषद, समता परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जयंतीचे औचित्य साधुन देण्यात आलेल्या कार्यगौरव पुरस्काराचे वितरण
शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी जागृत शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी महंत श्री आवेराजजी महाराज यांचे हस्ते व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान महंत वेदांताचार्य गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के यांचे प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना म्हस्के महाराज बोलत होते.साईश्रध्दा लॉन्स मध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत कॉम. बाबा आरगडे हे होते.
आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, अड. देसाई देशमुख,
सावता परिषदचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे,राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल शेख, समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, भाऊसाहेब जावळे, रावसाहेब जावळे,आनंदवन संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे, सावता परिषदचे प्रधान महासचिव डॉ.राजीव काळे, गणेश महाराज चौधरी, डॉ. रावसाहेब फुलारी, सरपंच सौ.लताताई अभंग,सौ.स्वप्नाली क्षिरसागर आदी व्यासपीठावर उपस्थितीत होते.
महंत म्हस्के महाराज पुढे म्हणाले की, जी पूजा किंवा गौरव होतो तो वयावर, स्री-पुरुष भेदावर अवलंबून नसतो तो गुणांचा होत गौरव असतो. पूजा आणि गौरव हा त्यांच्या सदगुणांचा गौरव असतो.
स्वत:करिता कोणीही जगतो मात्र समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून समाजाप्रती केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. महापुरुषांच्या जीवनातून आपल्याला हेच शिकायला मिळते.
डॉ.राजीव काळे, सरिता मुंडे,कल्याण आखाडे,कॉ.बाबा आरगडे, पांडुरंग अभंग,
महंत श्री आवेराजजी महाराज यांनी ही मनोगत व्यक्त केले.
अमोल अभंग यांनी स्वागत केले.
जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुनिल गर्जे यांनी प्रस्ताविक केले.
समता परिषदेचे उपाध्यक्ष राहुल जावळे
यांनी आभार मानले.
*कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित व्यक्ति…*
माजी आ. पांडुरंग अभंग (सहकार),
कल्याणकाका आखाडे (सामाजिक),
सरिताताई मुंडे (महसुल),रंजनाताई बेल्हेकर (शैक्षणिक), शरद आरगडे (सरपंच),डॉ. कैलास कानडे (वैद्यकिय),
भाऊसाहेब सावंत (साहित्य), मनोज हुलजुते (उद्योजक),तुकाराम कल्हापुरे
(कृषी), चंद्रहास गवळी(समाजप्रबोधन),
आंनदवन-सोनई (सेवाभावी संस्था).