नेवासा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुल शेख आणि भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कुकाणा येथे सर्व धर्मीय बांधवांसाठी ईद ए मिलन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात सर्व धर्मीय धर्मगुरूंचा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देउन सन्मान करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यापद्धतीने अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले, सर्व धर्मियांना सोबत घेऊन स्वराज्य चालवले. महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व धर्मीय बांधवांना एकत्र आणत सामाजिक सलोखा जपण्याचे काम अब्दुल शेख आणि भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.
त्यांनी सर्व धर्मीय सलोखा जपला आहे.
कुकाणा हे गाव पूर्वीपासून सर्व धर्माच्या एकतेचे प्रतीक आहे, ग्रामदैवत न्यामत बाबांच्या कृपा आशीर्वादाने अब्दुलभैय्या देखील परंपरा जपत आहेत. ईद ए मिलन निमित्त भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सर्व धर्मीय धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी ज्ञानेश्वर महाराज तांबे, कृष्णा महाराज उगले, चांगदेव महाराज काळे, पाटेकर महाराज, पास्टर यहोशवा मोहिते, मौलाना इम्रान, मौलाना शमशाद, मौलाना सद्दाम पटेल आदी धर्मगुरूंनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
ईद ए मिलन या कार्यक्रमासाठी माजी आमदार पांडुरंग अभंग, किसनराव गडाख, ॲड.हिम्मतसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे, सरपंच लताताई अभंग, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार, अनिल माकोने, विलास देशमुख, अमोल अभंग, अशोक चौधरी, वसंतराव कांगुणे, संदीप लष्करे, राजू बागडे, अनिल गर्जे, नजीम सय्यद, शकुर सर, समीर सर, इस्माईल शेख,जावेद शेख आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भैय्या सामाजिक प्रतिष्ठानचे इम्तियाज शेख, अभिराज आरगडे, स्वप्नील कचरे, अशपाक इनामदार, सूरज पवार, रेहान शेख प्रतीक बडे, प्रज्वल साबळे आदी सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.