Friday, February 13, 2026

निळवंडेच्या आवर्तनातून गुहा, गणेगाव, तांभेरेचे गावतळे भरून द्या शेतकऱ्यांची मागणी  परिसरातील विहिरींनी तळ गाठला

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

गुहा: राहुल कोळसे:निळवंडेच्या लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना २० एप्रिल २०२५ पासून उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळण्याच्या दुष्टीने आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान या आवर्तनातून राहुरी तालुक्यातील गुहा गणेगाव तांबेरे व इतर गावातील गाव तळे भरून देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे या भागात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे या गावातील सर्व गाव तळे हे पूर्ण क्षमतेने भरून द्यावे.सध्या या भागातील विहिरींनी तळ गाठलेला आहे. या आवर्तनातून जर ही गावतळी भरली तर थोडाफार दिलासा हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. यामुळे कुठेतरी पशुधनही वाचू शकते.

अजून पावसाळा सुरू होण्यासाठी दिड महिन्याच्या आसपास चा कालावधी आहे तोपर्यंत पिण्याचा पाण्याचा बरोबर शेतीचाही मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जर हे गाव तळे भरले तर मोठ्या प्रमाणात दिलासा या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना होऊ शकतो.

[मागील आवर्तनात आमच्या गिनी गाव मधील गावडे भरले. परंतु काही अडचणी वर मात करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मदतीने काही तांत्रिक अडचणी दूर करत हे तळे भरले ह्या आवर्तनातूनही आमच्या घेणे गाव मधील सर्व गाव तळे भरून द्यावेत अशी आमची मागणी आहे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबरोबर चर्चा करू.

अमोल भणगडे

जिल्हा उपाध्यक्ष भाजपा माजी सरपंच गणेगाव गणेगाव]

————————————–

[मागील आवर्तनातून गणेगाव पर्यंत हे पाणी आलं होतं परंतु आमच्या गावातील एक दोन तळे भरल्यानंतर पाणी बंद करण्यात आलं होतं मात्र या आवर्तनातून आमच्या गावातील सर्व स्थळे हे पूर्ण क्षमतेने भरावे अशी आमची पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे आम्ही आग्रही मागणी करणार आहोत.

किरण कोळसे ग्रामस्थ गुहा]

————————————–

[सध्या विहिरीने तळ गाठलेला आहे. अजून जून महिना व पावसाळ्यासाठी वेळ आहे आता निळवंडे धरणातून दुसरे आवर्तन सुरू झाले आहे या आवर्तनातून आमचे तळे जर भरले तर कुठेतरी आम्हाला हा दिलासा मिळू शकतो.

बाळासाहेब रामकृष्ण कोळसे ग्रामस्थ गुहा]

 

————————————–

[मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे निळवंडीतून जर गुहा येथील गाव तळे भरले तर थोड्या प्रमाणात विहिरीला पाणी उतरून जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ .

 

बबनराव कोळसे

तालुका चटणीस भाजपा राहुरी]

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!