Friday, February 13, 2026

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना डीजे,लाउड स्पिकर वाजविल्यास व ड्रोनवर उडविलयास कायदेशीर कारवाईचा इशारा

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना डीजे, लाउड स्पिकर विजाविल्यास व ड्रोन उडडाण केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा परिक्षाविधीन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांनी दिला आहे.

नेवासा पोलीस ठाणेचे वतीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, उच्च न्यायालयानें क्रिमिनिल रिट पिटीशन नं ४७२९ / २०२१ या संदर्भात बेकायदेशीर रित्या बसवलेल्या लाउड स्पिकर इत्यादीमुळे होणा-या ध्वनी प्रदुषणाबाबत कायदयाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या ध्वनी प्रदुषणामुळे (डिजे वादयामुळे) अनेक वुध्द व्यक्ती, लहान मुले, आजारी इसम, विकलांग इसम यांचे आरोग्यास हानी पोहचत आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार डिजेवर बंदी घालण्यात आली असुन पोलिस ठाण्याचे हददीत कोणीही यापुढे डिजे वाजवणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घेतील.
तरी यापुढे पोलीस ठाणे नेवासा हददीत विनापरवाना ध्वनी क्षेपक लाउड स्पीकर लावुन वाजवताना मिळुन आल्यास संबंधीत चालक मालक,आयोजक यांचेवर ध्वनीप्रदुषण अधिनियम २००० मधील तरतुदीच्या अनुषंगाने प्रचलीत कायदयान्वये योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच पोलीस ठाणे हददीतील मंदिर, मशिद, मदरसा, चर्च, गुरुद्वार व इतर धार्मिक स्थळे यांनी संबंधीत ठिकाणी परवानगी घेवुनच लाउड स्पिकरचा वापर मर्यादित शासन निर्णयाप्रमाणे करावा.

सध्या चालु असलेल्या भारत पाकिस्तान तणावाचे वातारवणामुळे मा. आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग यांचे कडील SID/IG/CS@S/१४SCM/२०२५ – १९६२ दिनांक १४/०५/२०२५ अन्वये पोस्टे हददीत कोणीही इसम ड्रोन उड्डाण करणार नाही तसेच आढळुन आल्यास संबंधीतावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल वांची नोंद घ्यावी.
ध्वनीक्षेपाचा आवाजा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशना प्रमाणे ५५ डेसिबलपर्यंत ठेवावे.

क्षेत्र निहाय आवाजाची डेसिबल मर्यादा अशी…

——————————————-
अ.नं.–क्षेत्राचा प्रवर्ग–क्षेत्राची झोनची वर्गवारी–डेसीबल (ए) एलईक्यु मधील मर्यादा
———————————————–

अ) अ,क क्षेत्र औद्योगिक– ७५ (दिवसा),७० (रात्री)

ब) वाणिज्योत क्षेत्र– ६५ (दिवसा), ५५ (रात्री)

क) निवासी क्षेत्र– ५५ (दिवसा), ४५ (रात्री)

ड) शांतता क्षेत्र– ५० (दिवसा), ४० (रात्री)
———————————————-

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!