नेवासा
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असणारा मावा बनविण्यासाठी लागणारी १३० किलो बारीक- कातरलेली सुपारी नेवासा पोलीसांनी पकडली असून या सुपारीची चोरटी वाहतुक करणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबद्दलची अधिक माहिती अशी की, दि. २० रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील कुकाणा येथील बसस्टँड समोरील चौकामध्ये वाहन तपासणी करत असताना एक सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट वाहन क्रमांक एमएच१४ बीआर १४९२ यामधुन नेवासा फाट्याकडुन शेवगावकडे जात असताना तीला थांबण्याचा ईशारा करुन थांबविले असता व नमुद वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये मावा, गुटखा, सुगंधीत तंबाखु तयार करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणारी बारीक कतरलेली सुपारीसह अमोल पंढरीनाथ काळे (वय २८ वर्षे), रा. उस्थळ दुमाला ता. नेवासा जि. अहिल्यानगर हा मिळुन आला.
सदर घटनेत ४ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट वाहन क्रमांक एमएच१४ बीआर १४९२ गाडी व
४६ हजार ८०० रुपये किंमतीचे दोन पोते त्यामध्ये मावा-गुटखा-सुगंधीत तंबाखु तयार करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणारी बारीक कतरलेली सुपारी अंदाजे १३० किलो (प्रति किलो ३६०/- रुपये)
सुपारी असा एकुण ४ लाख ४६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेला असुन सदरचा मुद्देमाला पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेवुन कुकाणा दुरक्षेत्र येथे ठेवण्यात आलेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कारवाईचा बडगा उगरण्यात आलेला असुन ज्या व्यक्तींवर सदर कायद्यांतर्गत एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील त्यांच्याविरुध्द जास्तीत जास्त रक्कमेचा बॉन्ड घेवुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच यापुढेही सदर ईसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही फरक न पडल्यास हद्दपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार असल्याचे नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर
वैभव कलुबमें व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांचे सुचना व मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.