नेवासा
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विना परवाना अवैध रित्या दारुची विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करणाऱ्या ईसमांविरुद्ध नेवासा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की, दि. २० रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकामधील कुकाणा कडे जाणारे रस्त्यावर वाहन तपासणी करत असताना एक सफेद रंगाची सिआझ वाहन क्रमांक एमएच ०१ सीडी ०४१६ यामधुन कुकाणा गावाकडे जात असताना तीला थांबण्याचा ईशारा करुन थांबविले असता व नमुद वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये देशी भिंगरी, संत्रा कंपनीचे दोन बॉक्स ज्यामध्ये एकुण २०० बॉटलसह वाहन चालक व सोबतच्या इसमांचे नाव रोहीदास भगवान गुंजाळ (वय ३३ वर्षे), अभिषेक दुर्गाअण्णा गुंजाळ (वय २२ वर्षे), दोघे रा. चिलेखनवाडी ता. नेवासा जि.अहिल्यानगर हे मिळुन आले असुन
सदर वाहनामध्ये मिळुन आलेल्या दारुचे बाटल्यांचे वर्णन खालीलप्रमाणे..
५ लाख रुपये किंमतीची सिआझ वाहन क्रमांक एमएच ०१ सीडी ०४१६
अशा वर्णनाची गाडी व ७ हजार रुपये किंमतीचे दोन बॉक्स ज्यामध्ये देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या २०० दारुच्या बाटल्या (प्रति बॉटल ३५/- रुपये प्रमाणे)
असा एकूण ५ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेला असुन सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन नेवासा येथे ठेवण्यात आलेला असुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कारवाईचा बडगा उगरण्यात आलेला असुन ज्या व्यक्तींवर सदर कायद्यांतर्गत एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील त्यांच्याविरुध्द जास्तीत जास्त रक्कमेचा बॉन्ड घेवुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच यापुढेही सदर ईसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही फरक न पडल्यास हद्दपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार आहे असे नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी ठणकावून सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक
राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबमें, उप विभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांचे सुचना व मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कलेली आहे.