नेवासा
कायदेशीर परवानगी न घेता विनापरवाना बेकादीरपणे कर्कश आवाज करुन न्यायालयाच्या तसेच शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन सुरु असल्याचे आढळुन आल्याने नेवासा पोलिसांनी डॉल्बी साऊंड चालका विरोधात कारवाई
करून गुन्हा दाखल केला आहे.
या बाबद अधिक माहिती अशी की, नेवासा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी काही दिवसापुर्वीच नेवासा पोलीस ठाणे हददीत बेकायदेशीरपणे डॉल्बी साऊंड – वाजवीणा-या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचे जाहीर केले होते. त्याअनुषांगाने दि. २० मे रोजी निसर्ग लॉन्स देवगड फाटा येथे सावकार डीजे नावाने डॉल्बी साऊंड तसेच आराध्या लॉन्स नेवासा येथे संघर्ष डी.जे. नावाचे डॉल्बी साऊंड कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता विनापरवाना बेकादीरपणे कर्कश आवाज करुन न्यायालयाच्या तसेच शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन सुरु असल्याचे आढळुन आल्याने सदरचे डी.जे साऊंड पोलीस ठाणेस आणुन यातील आरोपी अमोल अण्णा थोरात रा. कोलगेट चौक, वाळुंज एमआयडीसी, छ. संभाजीनगर याचे विरोधात नेवासा पोलीस ठाणे गु.रं. नं ५०८/२०२५ भा. न्या. सं कलम २२३ तसेच महा. पोलीस अधिनीयम कलम ३३/१३५ अन्वये व आरोपी कबीर हकीम पठाण,चांद रज्जाक शेख दोन्ही रा. मानोरी,ता. राहुरी जि. अहिल्यानगर यांचे विरोधात नेवासा पोलीस ठाणे गु.रं.नं ५०९/२०२५ भा. न्या. सं कलम २२३ तसेच महा. पोलीस अधिनीयम कलम ३३/१३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदरची कार्यवाही परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे, पोलिस उपनिरिक्षक विकास पाटील, पो.हवालदार अजय साठे, पोशी करंजकर, पोशी वैद्य, पोशी बोडके, पोशी जाधव, पोशी तांबे हे पुढील तपास पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहे.
…तर कायदेशीर कार्यवाही
नेवासा पोलीस ठाणे हददीत कोणीही विनापरवाना, बेकायदीरपणे डी.जे साऊंड लावु नये अन्याथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
-संतोष खाडे
परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक