Thursday, May 21, 2026

प्रहारचे बच्चुभाऊ कडू शेतकऱ्यांसाठी उद्या अकोल्याच्या मैदानात

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कांदा, ऊस, संत्रा यांचे झालेले नुकसान व हातबल झालेला शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे उद्या गुरुवार दि. २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांनी विधानसभेच्या बाहेर शेतकरी व दिव्यांगणा न्याय मिळण्यासाठी छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथून आंदोलनाचा शड्डू ठोकून प्रारंभ केला आहे. शेतकरी आणि दिव्यांग यांच्या मागण्या रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपूर्ण टीमला कार्यरत करून छत्रपती शिवरायांचे विश्वासू मावळे संताजी धनाजी पुरस्कार देऊन पुन्हा कार्य केले आहे. राजकारणात पराभव थांबू शकत नाही, लढण्याची धमक लागते असं सांगत महाराष्ट्र पिंजून काढलाय या शेतकऱ्यांची धडाडणारी तोफ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ यांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुका येथे सभेचा शुभारंभ करण्याचे ठरवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कांदा ऊस संत्रा यांचे झालेले नुकसान व हातबल झालेला शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभेचे आयोजन अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवार दि.२२ रोजी सायंकाळी ६ वाजता केलेले आहे.
या सभेसाठी जास्तीत जास्त शेतकरी दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान आहिल्या नगर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी दिव्यांग बांधव व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!