नेवासा/सुखदेव फुलारी
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने विशेष कार्याबद्दल संसद भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बुधवारी दि.२१ मे रोजी नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे झालेल्या सन्मान सोहळयात खा.वाकचौरे यांना संसद भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.