अहिल्यानगर
राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट सुरू आहे. गुरुवारी (दि.२२) राज्यातील २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
यामध्ये नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबईत बदली झाली असून रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नगरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. मात्र, मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या वगळता पोलीस दलात फारसा बदल केलेला नव्हता. याचे कारण पूर्वीच्या सरकारमध्येही फडणवीस हेच गृहमंत्री होते व आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही गृहमंत्रीपद त्यांच्याचकडे आहे. दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येतात. त्यानुसार, पोलीस दलात खांदेपालट सुरू आहे.
*अधिकाऱ्याचे नाव व बदलीचे ठिकाण
असे…
१) राकेश ओला- पोलीस उपआयुक्त मुंबई
२) सोमनाथ घार्गे- पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
३) आंचल दलाल- पोलीस अधीक्षक, रायगड
४) महेंद्र पंडित-पोलीस उपआयुक्त, ठाणे
५) योगेशकुमार गुप्ता- पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
६) बच्चन सिंह-समादेशक, राज पोलीस बल गट ४ नागपूर
८) अर्चित चांडक-पोलीस अधीक्षक, अकोला
८) मंगेश शिंदे- पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर
९) राजतिलक रोशन-पोलीस उपआयुक्त, मुंबई
१०) बाळासाहेब पाटील- पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण)
११) यतीश देशमुख-पोलीस अधीक्षक, पालघर
१२) सौरभ अगरवाल-पोलीस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण) पुणे
१३) मोहन दहीकर-पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
१४) विश्व पानसरे-समादेशक, राज्य पोलीस बल गट ९ अमरावती
१५) निलेश तांबे-पोलीस अधीक्षक, बुलढाणा
१६) समीर शेख-पोलीस उप आयुक्त, मुंबई
१७) तुषार दोषी-पोलीस अधीक्षक, सातारा
१८) सोमय मुंडे-पोलीस उप आयुक्त, छ. संभाजीनगर
१९) जयंत मीना-पोलीस अधीक्षक, लातूर
२०) नितीन बगाटे-पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
२१) रितू खोकर-पोलीस अधीक्षक, धाराशिव
२२) संजय जाधव- प्रतीक्षेत