अहिल्यानगर
महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे वतीने मंगळवार दि. २७ मे रोजी सकाळी १०:३० वाजता माढा,जि. सोलापूर येथे राज्यस्तरीय केळी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे केळी उत्पादक शेतकरी संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम सर्जे यांनी दिली.
माढा येथील जगदाळे मंगल कार्यालयात होत असलेल्या या तिसऱ्या राज्यस्तरीय केळी परिषदेचे उद्घाटन खासदार धैर्यशीलभैय्या मोहीते पाटील, आमदार अभिजीत आबा पाटील व आमदार नारायण आबा पाटील, दादासाहेब साटे, जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांचे उपस्थितित होणार आहे.तर केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण यांचे मार्गदर्शन होणार आहे.
सुरेंद्र देशमुख यांचे निर्यातक्षम केळी उत्पादन या विषयावर, मनोहर पाटील यांचे’ खत व्यवस्थापन’ या विषयावर, मार्गदर्शन होणार आहे.तर डॉ. विद्या मनोहर सोनवणे यांचे केळी व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
या केळी परिषदेत महाराष्ट्रातील केळी पिकाच्या समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी केळी पिकाच्या क्षेत्रातील विचारवंत आणि केळी पिकाशी पुरक उद्योजकांनी एकत्रित येवून या परिस्थितीवर योग्य चर्चा करून त्याचे कारण शोधून त्याच्यावर ठोस उपाय योजना सुचविण्यात येणार आहेत. केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश, हमीभाव, पिकविमा, केळी या पिकाचा भाऊसाहेब फुंडकर योजनेत समावेश या व इतर अनेक गरजेची पुर्तता करण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने राज्यस्तरीय तिसऱ्या केळी परिषदेचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या केळी परिषदेस उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण, अतुल माने, डॉ.हनुमंत चिकणे, किशोर चौधरी, छगन गुजर, उत्तम पाटील, राजेश नवाल, पंढरीनाथ इंगळे, सचिन कोरडे, महेंद्र पाटील, वैभव पोळ, पुरुषोत्तम सर्जे, धिरज पाटील, ओंकार पवार, केशव गायकवाड, रत्नाकर पाटील यांनी केले.