नेवासा
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाणी पाजले. वीर भारतीय जवानांच्या पाठीमागे संपूर्ण भारत उभा असून, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा पूर्ण विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.
नेवासा येथे ५०० फूट तिरंगा ध्वजाची रॅली काढून शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी लंघे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशभरातून निघणाऱ्या तिरंगा रॅलीद्वारे जवानांच्या पाठीशी असलेला जनसमुदाय दिसून येत आहे. नेवासातील जनतेनेही या माध्यमातून आपल्या देशभक्तीची प्रचिती दिली आहे. सिंदूर ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांना आणि पहलगाव येथे दुर्दैवी मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख मेजर, धनक मेजर, जावळे मेजर हे उपस्थित होते.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार विठ्ठलराव लंघे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे, तहसीलदार संजय बिरादार, गटविकास संजय लखवाल, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे, भाजपा नेते निरंजन डहाळे, ज्ञानेश्वर पेचे, सचिन देसरडा, तेजश्री लंघे, भाजपा मंडलाध्यक्ष प्रतापराव चिंधे, ऋषिकेश शेटे, रामभाऊ खंडाळे, प्रशांत बहिरट,उदय कुमार बल्लाळ, अजित नरुला, सतीश मुळे, अशोक टेकणे, राजेश कडू, आदिनाथ पटारे,मयूर वाखुरे, शोभाताई आलवणे, अमृता नळकांडे, डॉ. मनीषा वाघ आदींसह असंख्य नेवासकर नागरिकांनी तिरंगा रॅलीत सहभाग घेतला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून वि श्रद्धांजली अर्पण केली.
मेजर अशोक चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी प्रास्ताविक केले.