नेवासा
नेवासा पोलिसांनी ११ लाख रुपये किंमतीचे गोवंश जातीचे कातडी जप्त करून या कातड्याची बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबद दि. २२ रोजी सायंकाळी ०७ वाजेचे सुमारास प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना माहिती मिळाली की, श्रीरामपूर बाजूकडून नेवासाकडे एमएस १७ सीव्ही ४५८२ या चारचाकी गाडीमध्ये गायींची कत्तल करून त्यांचे कातड्याची बेकायदेशीर रित्या वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस स्टॉपला थोडक्यात बातमीचा आशय सांगून रवाना केले असता. नेवासा बुद्रुक शिवारात सदर वाहन थांबवून गाडी गाडीमधील इसमांना त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव चंद्रभान मारुती गवळी रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर, चंद्रकांत अशोक अहिरे रा. धुळे असे सांगून सदर गाडीमध्ये असणाऱ्या गोवंश कातड्या बाबत विचारणा केली असता त्यांनी काहीएक उपयुक्त माहिती न देता उडवा उडवी चे उत्तर दिले त्या अनुषंगाने पंचासमक्ष सदर वाहनातील अंदाजे २२०० नग गोवंश कातडी ११ लाख रुपये किंमतीचे तसेच टाटा कंपनीचे १६ टायर वाहन किंमत अंदाजे रुपये ३२ लाख ५० हजार असे एकूण ४३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून सदर दोन इसमाविरुद्ध गोवंश जातीचे गाईची कातडी बेकायदेशीर रित्या वाहतूक करत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे नेवासा येथे प्रचलित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
सदरचे कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी संतोष खाडे व पोलीस स्टाफ यांनी केली आहे.